Tuesday, October 15, 2013

पसारा

आज जरा विचार केला हा सगळा पसारा आता आवरूनच घ्यावा. खूपच विस्कटलय सगळ. जरा हिम्मत करूनच दार उघडलं मनाच्या त्या कप्प्याच आणि खूप दिवसांच्या साचलेल्या आठवाणींना उत आला. जिथे-तिथे पसरल्यात तुझ्या आठवणी. अगदी पाय ठेवायलाही जागा नाही रे. पण तरीही, तरीही थोडी जागा केली स्वतःला उभ राहण्यासाठी. तोल सांभाळत राहीन उभी मी. जराशी डगमगेल पण पडणार नाही. आणि पडलेच जरी त्या साचलेल्या आठवणीत तरी झटकून देईन त्यांना. कारण खरंच नकोय पसारा पुन्हा. ह्या मोत्याच्या माळेसारख्या भासणाऱ्या आठवणी जळमट होऊन श्वास कोंडतायेत आता.

No comments:

Post a Comment