Tuesday, July 12, 2011

खरंच काही चुकल आहे कि उगीचच मला अस वाटतंय... काही तरी मिसिंग आहे पण काय ते कळत नाहीये... माझं  स्वच्छंदी मन सैरभैर होतंय आणि भरकटलेल्या पाखरा सारखं कावरबावर ही. रस्ता हाच आहे, मी choose केला होता ना मग आता कसली वाट पहातीये मी?? का गोंधळ उडाला माझा? आपण एकत्र राहू, एकमेकाला साथ देऊ, नेहमी बरोबर राहू असं कुठलच आश्वासन दिल नव्हत आम्ही एकमेकाला... .... एकमेकाला??? नाही त्यानं मला..  मी दिलं होत आश्वासन नेहमी त्याच्या बरोबर राहाण्याच, प्रत्येकवेळी साथ देण्याच, त्याच्यावर मनापासून प्रेम करण्याचं. त्यानं आश्वासन दिलंचं नाही असं नाही... पण तो काही म्हणालाही नाही. निर्णय नाही घेऊ शकला infact अजूनसुद्धा नाही घेऊ शकत... त्याच्या भाषेत सांगायचं तर, "जब तक हम साथ है तब तक है, बादमे पता नही...." कशापासून पळत होता तो?? Commitment पासून?? कि त्याच्या भूतकालापासून ... कि आमच्या नसलेल्या भविष्यकाळापासून.... मी खरंच एकदा तरी त्याला विचारायला पाहिजे होत. पण नाही यापैकी कशाचाच उत्तर नाही मागितलं मी. कारण...?? कारण ही तेवढंच  सरळ आणि साधं होत मी त्याच्यावर प्रेम केल होत.. हो कारण माझं त्याच्यावर खरंच प्रेम होत. भूतकाळ सगळ्यांनाच असतो त्याला ही होता.. जरा वेगळ आहोत एवढाच.. पण मी ते सर्वच स्वीकारलं होत.. त्यानं फक्त एकदाच म्हणायला हव होत "we will" पण तेंव्हा ही तो म्हणाला "I will" आणि माझं होत नव्हत ते उसण  अवसानही गळून पडल..
त्यान प्रेम केल, पण भरभरून प्रेम करणं कधी जमलंच नाही त्याला... माझी अपेक्षा खूपच छोटी होती..rather खूप छोट्याछोट्या गोष्टीच मला आनंद  वाटतो आणि त्या गोष्टींच interpretation करण्याचा त्याचा आट्टहास. खूप हुशार आहे तो, पण त्याची हुशारी माझा आनंद कमी करणारी होती. बाहेरच्या जगासमोर खूप प्रक्टिकल असणारी मी त्याच्या समोर एकदम अल्लड होऊन जायचे. एकदम लहान मुलांसारखा हट्टही करायचे कधीतरी.. कधी मुद्दाम रुसायचे, कधी त्याचा मूड ठीक करण्यासाठी खूप-खूप हसायचे ही...तरीही माझ्या मनातल त्याला कधी ओळखता आलाच नाही. माझ्या रुसण्या मागेही त्यानं मला हसवाव हीच अपेक्षा होती, त्याला हसवण्यामध्ये माझी कितीतरी tensions मी विसरत होते. पण माझे tension तो कधी share करू नाही शकला rather त्याला ते कधी मी सांगितल्या शिवाय कळलेच नाहीत. माझ्या इथे पडणारा पाऊस मला त्याला ऐकवायचा होता म्हणून केलेल्या फोनवर "यहा काफी गर्मी है आज.." या वाक्यांनी खरंच पाणी फेरल होत.. वाटल समोर पडणारा पाऊस नाही कळला याला, माझ्या मनातला पाऊस कसा समजणार? परत विचार केला नाही असं काही नाही खरंच जास्त गरम होत असेल तिथे आणि नाही तरी माझ्या इथल्या पावसानी तिथे काही फरक पडणार होता का, नाहीतरी असं फक्त सिनेमातच होत .. विचार बदलला मी पुन्हा शांत झाले. पण मन मात्र त्याच्या तिथल्या उन्हानी भाजून निघत होत... एकदा फोन त्यानं केला तिथे खूप आभाळ भरून आलं आहे, पाऊसही पडेल आता, खूप छान आहे वातावरण म्हणून फोन केला म्हणाला, माझं मन त्याच्या इथे बरसणाऱ्या पावसात न्हाऊन निघाल... म्हणल काहीतरी कारण असेल मागच्यावेळी म्हणून त्याच्या लक्षात नसेल आला माझा पाऊस. 
माझंही काम वाढत होत पण तरीही मी त्याला वेळ देतंच होते.. त्याला गरज असेल तेंव्हातर मी माझी काम बाजूला ठेऊन त्याला "ऐकत" होते. स्वतःला जरा बाजूला ठेऊन त्याच्या सो called priority जपत होते. तोही ऐकून घ्यायचं मला, फरक फक्त एवढाच होता कि तो ते त्याच्या वेळेनुसार करायचा. मी traffic मध्ये फसलो आहे, ऑफिसमध्ये समोर बसून कोणीतरी डोकं खातंय, नावडीच जेवण आहे आज, अंग दुखतंय ना, गाडी बंद पडली अशा कित्तीतरी गोष्टी तो सांगायचा. मला कळत होत, त्याक्षणी त्याला मी बरोबर असावस वाटत होत. यापैकी एकावरही उपाय नको होता. फक्त तो हे सगळ share करत होता. क्वचितच कधी म्हणायचा आठवण येतीये तुझी. मग मीही हसायचे म्हणायचे ये निघून इकडे! थोडावेळ असाच शांततेत जायचा, मग मीच विषय बदलायचे कारण मला माहिती होत तो काहीच उत्तर नाही देऊ शकत. एकदिवस म्हणाले, तुला वेळ नाही मिळत तर मीच येते तिकडे २ दिवसांसाठी. जरासा हसला क्षणभर थांबला मग "ये" म्हणाला, पण मग मीच नाही म्हणाले त्याच्या त्या क्षणभराच्या थांबण्याचा अर्थ मला उमगला. काही गोष्टी आपल्या हातात नसतात यावर त्याचा विश्वास होता. पण थोडासा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे हा माझा प्रश्न होता.

दोघांनाही कळून चुकल होत आपण खरंच एकमेकांच्या प्रेमात पडलो आहोत पण हेही समजल होत कि आपण एकत्र नाही राहू शकत. सगळी कुंपण ओलांडून आलेलो आम्ही दोघे शेवटी पुन्हा आपापल्या मार्गांनी निघालो आहोत... त्यातही थोडा फरक आहेच, तो एकटाच निघालाय आणि मी मात्र त्याच्या आठवणीना बरोबर घेऊन चालती आहे.