Thursday, September 22, 2011

मीच का??

मीच का???
प्रश्न असं साधाच आणि छोटासाच पण भयंकर डोकं खाऊ…. कारणही तसंच.. दरवेळी मी फोन करायचा त्यान तो उचलायचा हे सांगण्यासाठी कि तो BUSY आहे. प्रत्येक फोन वर वेगवेगळ उत्तर तयारच असायचं, पण त्यासाठी “त्यानं” फोन उचलला तरी पाहिजे ना… म्हणजे असं कि १० मधल्या ५ वेळा फोन उचलायचा नाही बर बाकीच्या ५ मधल्या ३ वेळा तो दुसऱ्या कोणीतरी “answer” करायचं आणि फोन म्हणाल्यावर तो एकदा तरी switched off असणारच आणि उरलेल्या एक वेळेस “तो” स्वतः फोन उचलतो, तेही अगदी २ रिंग मध्ये, आणि म्हणतो — “अग जरा बिझी आहे नंतर करतो तुला फोन आरामात” … वाह काय उत्तर आहे!! त्याचा so called ‘नंतर’ कधी येत नाही… तो येतो पण तो पर्यंत मी वाट बघून बघून पुन्हा फोन केलेला असतो, कारण मध्ये २-३ आठवडे उलटलेले असतात तो पर्यंत…. दरवेळी मीच वाट बघायची, पुन्हा मीच फोन करायचा, त्यानं नेहमीच बिझी असं आणि माझ्या बिझी किंवा schedule timing मधूनही मी वेळ काढून फोन करणं… का…?????? नेहमी मीच का?????
या प्रश्नच उत्तर माझ्या स्वतः कडे ही नव्हत कदाचित कोण कडेच नसतं… पण तरीही फोन करणं सुटत नाही आणि त्या उत्तरांची पण सवय होऊन जाते मग… मग त्याचा त्रासही होत नाही, कारण आता मलाही त्याच्या बिझी असण्याची सवय झालेली असतेना….अपेक्षा केल्या आणि पूर्ण नाही झाल्या तर वाईट तर वाटतच ना.. मग अपेक्षा करणंच सोडून दिल आणि सगळ कस सोप्प झालं… प्रश्नांनी प्रश्न वाढतच जातात आणि अजूनच नवे प्रश्न निर्माण होतात…त्यापेक्षा एकान ऐकून घ्याव मग सगळा गुंता सुटत जातो… आणि नाही जरी सुटला गुंता तरी नवीन निर्माणही होत नाही… :)
तसं माघार घेण एवढपण अवघड नसतं कधीच. Infact आता वाटत कि उगाचच चिडले मी तेंव्हा, असतात काम एखाद्याला मीच वेड्यासारखी माग पडले त्याच्या…कदाचित.. कदाचित त्याला मी थोडा वेळ द्यायला पाहिजे होता… पण पुन्हा हे सगळ समजून उमजून ही घ्यायचं मीच.. मला पण वाटत त्यानं कधीतरी हे सगळ समजून घेऊन मला एखादा फोन करावा. असं नाही कि त्याला काही बोलायचं नसतं, कारण ‘माझ्या’ प्रत्येक फोन कर ‘तोच’ बोलत असतो. त्याला अगदी महत्त्वाच काही तरी सांगायचं असतं किंवा मग एक गम्मत सांगतो म्हणून तास न तास बोलत बसतो…. बर आणि प्रत्येक गोष्टीच्याशेवटी “यार तू असायला पाहिजे होतीस तिथे” असं ही म्हणतो… मग पुन्हा माझ मन मला म्हणत “त्याला ही आठवण येतेच कि.. ” मी मात्र उगीचच अजूनच confuse होते… त्याच्या मनातल ओळखू नाही शकत म्हणून वाईट वाटून घेते… पण एक दिवस ठरवलं अजून नाही अडकायचं या गुंत्यात.. थोडा त्रास होत असं एकदमच सगळ सोडताना पण नाही, पुन्हा न अडकणेच बरे… आधी वाटल माझ असं वागण त्याला माणूसघानेपणा वाटेल, नाहीतर म्हणेल अशी खडूस सारखी का वागतीयेस…..पण दिवसा मागून दिवस गेले तो काहीच म्हणाला नाही आणि मग मीही माझ्या कामात बुडून गेले कामाच्या नावाखाली त्याला विसरून गेले…..
अचानक एक दिवस फोन आला —- त्याच आवाज ऐकून प्राण कानात आले… एका सेकंदात सगळा भूतकाळ डोळ्यासमोर लख्ख उभा राहिला… मध्ये कित्तीतरी दिवस उलटले होते, मी त्या दिवसांचा हिशेब लावणार इतक्यात त्यानं सांगितलं किती दिवस नाही महिने झालेत..!! आम्हा दोघांना बोलून..मी निशब्द.. फक्त ऐकत राहिले… त्याच बोलण सुरूच होत.. नुसत बोलून नाही तर आम्हाला भेटून ही महिने उलटले होते.. तो “Sorry” म्हणत होता कारण त्याला आता काळात होत कि वाट बघण काय असतं ते…..आता मला त्याला भेटायाची ओढ लागली.एखाद्याला वाट बघायला लावण किती त्रासदायक असतं हे मला चांगलाच ठाऊक होत…. तितक्यातचतो म्हणाला, मला तुला भेटायचं आहे -आजच..!! मी माझ्याही नकळत “हो” म्हणाले… भेटलो, बोललो नाही पण संवाद झाला फक्त नजरेनच… हा निःशब्द संवाद फक्त त्याच्याशीच व्हायचा… काहीतरी म्हणून दोघेही हसलो… त्यानं माझा हात हातात घेतला म्हणाला, खूप दिवसांनी हसलो तुझ्या बरोबर…आता वाटल “तू भेटलीस” …. माझ्या मीच का या प्रश्नाच उत्तर मला मिळाल….