Monday, February 18, 2013

नातं

मला या लेखच्या आधी थोडस सांगावस वाटत. हा लेख आज किंवा recently नाही लिहिलेला. मला माझा कप्पा आवरताना खूप जुनी वही सापडली आणि त्यातलं हे लिखाण! खूप काही आहे त्या वहीत. हे लिखाण आहे २२/ ११/ २००३ च. लेख वैगरे म्हणण्यासारख नाहीये काही पण तरीही ते जस आहे तसच्यातस टाईप केलेय इथे.. माहिती आहे त्यात चुका हि आहेत पण तरीही आपण लिहिलेले काही सापडलं, share करावस वाटल  म्हणून post करतीये. Hope you like it!!
नातं
माणूस आयुष्यात बरीच नाती बनवतो. त्यातली काही तो  जन्मापासूनच घेऊन येतो, तर काही तो स्वीकारतो, काही जमवतो आणि काही बनवतो, काही नाती जुळतात नकळत! पण प्रत्येक नात तो मनापासून जपतोच असही  नाही, काही निभावतो आणि काही नावापुरतीच ठेवतो. काही नाती "Relation " मध्ये बदलतात, काही जपतो प्रामाणिकपणे, मनापासून कधी निरीच्छेने नाइलाजाने आणि काही ओलाखीपार्यान्तच मर्यादित राहतात. काहींमध्ये इतका गुरफटतो कि स्वतःच भान हि हरपतो.
कधीतरी मग वेळ येते "त्या" नात्यांमधल्या खोलपणा, भावना, विश्वास या सर्वांचा विचार करण्याची. आई वडिलांपेक्षा मैत्रीच नात विश्वासच, आपलं वाटत. पण काही वेळेस आपल्या जन्मापासूनचीच नाही आपली आणि खरी वाटतात. कधी कधी वेळ येते, ती या सर्वांमधून एक नात निवडण्याची. मग सुरु होतो विचार - तो सुरवातीपासून आत्तापर्यंतचा... हिशेब लावला जातो किती दिलं, किती मिळवलं याचा. "Output " चा विचार आणि त्यासाठी मोजलेली किंमत. त्याग, प्रेम, विश्वास, द्वेष, राग, लोभ, अगदी सगळ्याचा.
काही ठिकाणी विश्वासातली नाती जपायची असतात आणि त्याच वेळी नात्यांवरचा विश्वासही सिध्द करायचा असतो. मग एक मानसिक द्वंद सुरु होत - विश्वासातली नाती Vs. नात्यांमधला विश्वास.

---