आत्ताच सुचलेलं .....

आयुष्य असंच असतं.... नदीच्या पाण्यासारख वाहणारं... कधी खळखळ करत तर कधी शांतपणे.. वळणावळणानी पुढे जाणार… प्रत्येक वळणावर काही तरी देणारं आणि आजुबाजूच्यांना आपल्यामध्ये सामावून घेणार… कधी निरागस - खट्याळ, तर कधी गंभीर, कधी सौम्य तर कधी रुद्ररूप धारण करणारं.…

वरून शांत पहुडलेलं पाणी त्याच्या पोटात कितीतरी गोष्टी ठेऊन असतं…आपणही असंच असाव, वरून अगदी शांत – साधं पण मनात खूप काही … स्वतःच्या इच्छा, गुपित, स्वप्न खूप काही असतातच.... पण दुसऱ्यांची “डायरी” होण्यातला आनंद वेगळाच..!! कुणाची स्वप्न share करावीत तर कुणाची गुपित मनाच्या खोल कप्प्यात साठवावीत… कुणाच दुःख हलक कराव, कोणाच्या आनंदाच कारण व्हावं… नदीच्या खळखळाटा सारखं खूप खूप हसावं, सर्वांना आपल्या बरोबर घेऊन चालावं आणि तितक्याच सहजतेने ओंजळ भरभरून देत जावं…