Saturday, August 27, 2011

"आदत"

नवीनच एक गाणं ऐकल... कानाला छान वाटलं म्हणून पुन्हा एकदा ऐकून कुठल्या पिच्चरच आहे तेही शोधून काढलं... त्यानंतर काय वाटल हे तुमच्याशी शेअर कारावास वाटल म्हणून लिहायला घेतलं.. सगळ्यांना आवडेलच असं नाही पण वाटल म्हणून लिहिलं...
गाण्याच्या शेवटी एक ओळ आहे,
"मै कभी भूलुंगा ना तुझे, चाहे तू मुझको देना भुला,
आदते जैसी ही तू मेरी, आदते कैसे भूलू भला....."
खरच किती माणस आपल्या आयुष्यात अगदी "आदत" बनून जातात... अगदी आपल्याही नकळत ते आपल्या रुटीन मध्ये येतात आणि मग आपल्याला ही त्यांची सवय होऊन जाते. अगदी घरातल्या कामवाल्या मावन्शीन्पासून ते सोसायटीच्या वॉचमनच्या चिंट्या पर्यंत... जिना उतरताना रोज भेटणाऱ्या काकू एखाद दिवस नाही भेटलेल्या तर आपल्यालाही चुकचुकल्या सारखं होत. पार्किंगमध्ये आपल्याच शेजारी लावलेल्या गाडीवरून आपण अंदाज लावतो कि शेजारचे काका आज ऑफिसला गेले कि नाही ते.. काही सवयी चांगल्या असतात पण  त्यांचीही सवय झाली कि मग त्या त्रास ही देतात..
पण काही वेळेस काही न काही कारणांनी आपल्याला काही लोकां पासून वेगळ व्हावं लागत, नोकरीच्या निमित्ताने घरापासून लांब राहाण, आपल्या मित्रांपासून आपल्या कट्ट्यापासून दूर जण हे जरा जास्तच त्रासदायी असतं... नव्या नोकरीची सवय होते. नवीन मित्र, नवीन ग्रुप भेटतात, पुन्हा नवीन कट्टा बनतो आणि गप्पा रंगतात.. आयुष्य मस्त चाललेलं असतं. आपल्यालाही रुटीनची "आदत" होऊन जाते.. मग कधी तरी चांगली opportunity मिळाली म्हणून आहे ती नोकरी बदलावी लागते..पुन्हा attachment -ditachment ची प्रचीती येते.. आपण पुन्हा जरासे हळवे होतो, वाईट तर वाटतच असतं पण नवीन स्वप्न आणि नवीन दारही खुणावत असतात..मग पुन्हा मनाची तयारी होते सगळ्यांना सोडून नवीन मित्रानाना भेटायची.... सगळे पुन्हा भेटू, कुठे?? कुठे काय आपण रोजच भेटू ना ओनलाईन!!! gtalk आहे, fb आहे, प्रोफेशनल साईट्स ही आहेतच कि मग काय आपण रोजच एकमेकाला दिसू, बोलू, नवीन अपडेट्स पाहू.. पण पण आपण भेटणार नाही हे कुणाच्याही लक्षात कस येत नाही... ??? भेटण आणि मनोसोक्त गप्पा मारण याची चव येणार आहे का त्या ओनलाईन भेटण्याला..???? नाही ना....
कारण शेवटी आपल्याच सवयी "आदते" आपल्याला छळत असतात... एका चहाच्या कटिंग सोबत होणाऱ्या नॉन कटिंग गप्पाची मजा ओनलाईन chatting ला कशी येणार?? पायऱ्यांवर बसून रंगलेली चर्चा आणि डिस्कशनमध्ये फरक असतोच...तिथे बसून केलेले plans आणि त्यानंतर लगेच बाईकला किक मारून निघण आतापुन्हा कधी होणार???एक न एक कित्ती तरी प्रश्न पडतात. पण उत्तरही मिळतात या प्रश्नांची, भेटून पुन्हा. आधी ओनलाईन मस्तपैकी डिस्कस करू प्लान बनवू आणि मग काय गाडीला किक मारून आपल्या "कट्ट्यावर" जमूया... कारण हा कट्टा ही सुद्धा एक आदतच आहेना..  आणि आता पुन्हा म्हणायचं,"आदते जैसी ही तू मेरी, आदते कैसे भूलू भला....."