Saturday, October 26, 2013

तो

दोन महिने उलटून गेले.. आता वाटतंय जरा चुकलंच तेंव्हा!! त्या वेळी अस नव्हत वागायला पाहिजे. रड-रड रडलीस तू पण नाही सावरू शकलो तुला. कसं सावरणार होतो? मी स्वःताच बावरून गेलो होतो. अजूनही स्पष्ट दिसतोय तो दिवस डोळ्यापुढे. असं वाटतंय आत्ता उठून याव आणि तुला घट्ट मिठीत घ्यावं. चतुर्थीचा उपवास होता तुझा. तरीही दिवसभर फिरून माझी शॉपिन्ग करवलीस. मी जेवलो आणि तू फक्त लस्सी घेतलीस. पुन्हा शॉपिन्ग पूर्ण दिवस आणि संध्याकाळी डिनरचा प्लान. तू येऊन सगळ आवरून सगळ्या गोष्टी जागेवर ठेऊन रूम आवरालीस. मी मात्र दमलो म्हणून जरा (?) पडलो होतो. तू रूम आवरून, मग आंघोळ करून अगदी फ्रेश-फ्रेश झाली होतीस. हलकेच मला उठवलस ८-८.३० वाजले होते संध्याकाळचे. मीही उठलो. नवीन शर्ट मधून एक शर्ट काढला तय्यार झालो. तो पर्यंत जराही कुरकुर न करता तू पुन्हा बाकीचे कपडे व्यवस्थित ठेवलेस. मग तुही तयार झालीस. wooow!! खरंच वॉव दिसत होतीस तू! मला तू सोडून काहीच दिसत नव्हत, तुला मिठीत घेऊन तासनतास बघवस वाटत होत. तू खूप excitement नी तयार होत होतीस. तुझ्या अदांवर मी फिदा झालो होतो. ड्रेस घातल्यावर मागून-पुढून स्वतःला आरशात निहाळणारी, मग माझ्याकडे वळून "खर सांग कशी दिसतीये?" विचारणारी, खांद्यावरचे केस हलकेच उडवणारी, पुन्हा ते केस सेट करताना अगदी तालात हलणारी मान, मग त्या हाय हिल्सवर balance करणं…. कित्ती आणि काय काय म्हणून सांगू. म्हणूनच विचारलं होत की डिनर इथेच ऑर्डर करूयात का? पण माझा naughty मूड ओळखून तू अगदीच firmly म्हणालीस "नो!! आपण बाहेरचं जायचय" आणि त्या नंतर… आपण मस्तपैकी बाहेर गेलो. तुझा दिवसभराचा उपवास, उन्हा-तान्हात माझी शॉपिन्ग, सगळी आवराआवरी तरीही जराही न दमता, तितक्याच उत्साहात होतीस तू. कारण तुला हा प्रत्येक क्षण हवा होता. उद्या आपल्यासाठी काय वाढून ठेवलंय याची कल्पना होती तुला. तुझं अस strong आणि बोल्ड असण मला पावलोपावली जाणवत होत आणि हिम्मतही देत होत. माझी सगळी हिम्मत तूच तर होतीस. तू होतीस म्हणूनच तर असा निर्णय घेऊ शकलो मी. फक्त मला कंपनी द्यायची म्हणून तू वोडका ऑर्डर केलास. चीअर्स… "For your health and wealth" म्हणंत तू स्वतःला त्यातूनही वगळलस. त्या काळ्या ड्रेसमध्ये हातात तो ग्लास आणि तुझ्यापासून कोणीही वेगळ न करू शकलेली तुझी स्माईल! तुला बघतच रहावस वाटत होत. तू खरंच बिनधास्त आहेस. स्वतःला कस कॅरी करायचं ते तुला पक्कं जमत. एवढा मस्त दिवस मी खरंच खूप वर्षांनी जगत होतो. खरंतर तू होतीस म्हणून जगत तरी होतो नाहीतर आज काल माझा सिलसिलाच अमिताभ झालाय - मैं और मेरी तन्हाई… इतकं सगळ पिच्चर-परफेक्ट असताना पुन्हा निघायची वेळ झाली. मला नक्की आठवत नाही पण साधारण १२-१२.३० ला आपण पुन्हा रूम वर आलो. तू लगेचच फ्रेश होऊन चेंज करून आलीस. मी फ्रेश होई पर्यंत तू मी काढून टाकलेले कपडे तू पुन्हा जागेवर ठेवलेस. झोपायची तयारी केलीस. माझा फोन चार्जिंगला लावलास. स्वतःच्या घरी फोन केलास. छोटी-मोठी काम आवरून जेंव्हा फ्री झालीस तेंव्हा जरा दमलेली वाटलीस. माझ्याशेजारी येऊन पाठ टेकावलीस तेंव्हा जरा उसासा टाकलास. तुला मिठीत घेतलं तर डोळे अगदी घट्ट मिटून घेतलेस. काय झालं विचारलं तर, "काही नाही रे" एवढंच म्हणून अजून माझ्याजवळ आलीस. पण तुझ्या मनात काहीतरी वेगळंच चाललेलं होत. मग मीच म्हणालो "परवा तुला सोडवायला नाही येणार मी एअरपोर्ट ला" "हम्म, मीही तेच सांगणार होते. तू नकोच येऊस, मी जाईन" "I am sorry… " मी पुढे काही म्हणणार तेवढ्यात तू वळलीस. क्षणात म्हणालीस "I am gonna miss you" त्या अंधारातही तुझ्या डोळ्यात तरळणारे अश्रू दिसले आणि माझी होती-नव्हती तेवढीही हिम्मत संपली. तू ढसाढसा रडत होतीस. बेडच्या टोकाला बसून हमसून हमसून रडणारी तू… तुला पाठमोर पाहताना सुद्धा जीव तुटत होता. खूप वाटलं की उठून तिथपर्यंत याव, तुला रडू नको म्हणांव. तुझा एक-एक अश्रू टिपावा, हात हातात घेऊन तुला शांत कराव…. पण मला फक्त वाटत होत. तुला सांभाळायची ताकद नव्हती माझ्यात. कारण आजपर्यंत आयुष्यात जेंव्हा-जेंव्हा असे काही प्रसंग आले तेंव्हा प्रत्येक वेळी तू साथ दिलीस. तुझ्या साथीतच तर सगळ निभावून नेलं होत, rather तू होतीस म्हणूनच तर मी सगळ फेस करू शकलो होतो. नाहीये माझ्यात हिम्मत एकट्यानी सगळ handel करायची. रात्रीचा दिवस व्हायची वेळ आली. पहाटेचे ४.३० वाजले होते. आताशी जरा शांत झाली होतीस. माझ्या हाताची उशी करून झोपलीस. मी मात्र बेचैन होत होतो. या पुढे तू नसणार हि कल्पना सुद्धा अंगावर काटा आणणारी होती. पण आता दुसरा काहीच पर्याय नव्हता. तू खूप हिमतीने साथ दिली होतीस. त्यामुळेच तर हा निर्णय घेतला मी. I am so glad you are there! फक्त तूच समजू शकलीस हे सगळ. या सगळ्यातही न चिडता, न किरकिरता तू साथ दिलीस. आयुष्यभर पुरेल एवढी हिम्मत, बळ दिलयस. मी मात्र फक्त अश्रूच देऊ शकलो तुला. म्हणूनच म्हणालो "चल, जरा वेळ देऊयात या नात्याला. वेगळे होऊयात". आता वाटतंय तेंव्हा जर मला आडवलं असतस तर? तू जरा भांडायला पाहिजे होतास ग त्यावेळी, मला ओरडायला, माझ्यावर चिडायला हवं होतस. नेहमीच मला साथ देणारी तू, अशावेळी तरी जरा हट्टीपणा करायचा होतास. नाही होणार तुझ्याच्याण हे कसं नाही कळल मला?? मी खरंच खूप वाईट वागलो तुझ्याशी. आय अम रिअली सॉरी डार्लिंग. पण खरंच सांगू तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी - I need you!

Tuesday, October 15, 2013

पसारा

आज जरा विचार केला हा सगळा पसारा आता आवरूनच घ्यावा. खूपच विस्कटलय सगळ. जरा हिम्मत करूनच दार उघडलं मनाच्या त्या कप्प्याच आणि खूप दिवसांच्या साचलेल्या आठवाणींना उत आला. जिथे-तिथे पसरल्यात तुझ्या आठवणी. अगदी पाय ठेवायलाही जागा नाही रे. पण तरीही, तरीही थोडी जागा केली स्वतःला उभ राहण्यासाठी. तोल सांभाळत राहीन उभी मी. जराशी डगमगेल पण पडणार नाही. आणि पडलेच जरी त्या साचलेल्या आठवणीत तरी झटकून देईन त्यांना. कारण खरंच नकोय पसारा पुन्हा. ह्या मोत्याच्या माळेसारख्या भासणाऱ्या आठवणी जळमट होऊन श्वास कोंडतायेत आता.