Tuesday, December 20, 2011

लग्न

"मी काय म्हणते..."
"काsय??"
"नाही म्हणजे कस की...."
"की...??"
"जाउदेत तुला सगळी मजा वाटते..."
"अग सांग ना काय झालं??"
"हे बघ आता तरी जरा सिरीअसली घे लग्नाचं."
"........" माझ्या मनात एकाच प्रश्न का..!! लग्न करायचं, ठीक आहे मी काही ब्रम्हाचर्य स्वीकारलं नाहीये पण आत्ताच का.. अजून थोडे दिवस थांबाना.  पण पुन्हा नवीन प्रश्न थांबायचं कारण? म्हणजे तू कोणी बघून ठेवला असशील तर सांगना, आम्हाला काहीच हरकत नाहीये.. आहे का कोणी??
"नाही"
"मग?"
"मग काय?"
"नाही मग थांबायचं कशाला? तू २- ४ जणांना भेटलीस तरीही काही म्हणाली नाहीस पुढे, म्हणून म्हंटल.... आणि कसं आहेना कि वय वाढलं कि मग अड्जेस्त्मेंत जास्त कराव्या लागतात, त्यापेक्षा थोडस compromise कर आता. नाही तरी कोणीही perfect नसतच ग"
काय म्हणणार या पुढे.. विषय संपला!! Adjustments, compromises सगळ मान्य आहे, ते तर करावाच लागेल पण मला आत्ता लग्न करायचं नाहीये.. हे कसं कळत नाही यांना. सिम्पल आहे यार कि जर कोणी असला असता तर मी एवढी कारण दिली असती का??? सांगितलं नसत का, कि या मुलाबरोबर लग्न करायचं आहे म्हणून?
आणि बर लग्न का करायचं? कारण माझ्या वयाच्या मुलींची आणि आता तर मुलांचीपण लग्न झाली किंवा ठरली म्हणून... सगळ्यांनी केल म्हणून तू पण लवकर लग्न कर. किंवा मग "आपल माणूस असाव" म्हणून.. नाहीतर मग सामाजिक सोपस्कार म्हणून....????
मला कळतच नाहीये कि का एवढे सगळे माग लागलेत. लग्न करायचं मला, मी काही लग्न न करण्याची शपथ वैगरे घेतली नाहीये पण.... हा पणच जरा आडवा येतोय!
लव्ह म्यारेज कि अरेंज म्यारेज?? माहित नाही.. लग्नाचं विचार करायला लागल्यावर "लव्ह" म्यारेजच्या ऑप्शनचा पहिला विचार होतो. आणि मग काही चेहरे डोळ्यापुढे येतात, काहीतरी वाटत राहत उगीचच. कधी तरी मजेतच म्हणलेलं एखाद वाक्य आठवत, एकत्र घालवलेले क्षण उगीचच हळवे करतात मनाला. कुठतरी खोलवर काहीतरी टोचत असतं मनात. आठवणीतला पाऊस डोळ्यात साठत राहतो.. बाहेरच ऊन मनाला चटके देत राहत, काही तरी निसटत असतं, मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते पण फक्त प्रयत्नच! स्वतः सावरते पण हे मन.. त्याला नाही मी सावरू शकत. आठवत राहतात त्या तासनतास चालणाऱ्या गप्पा, खळखळून हसण, sms करणं.... हुरहूर, रुखरुख ह्या शब्दांचा अनुभव तेंव्हा येतो.. जे निसटत असतं ते समजत तरीही काही न समजल्यासारख करायचं. कारण, कारण वेळ निघून गेलेली असते. मधल्या काळात खूप काही बदलेल असतं. निरागस मन मग व्यवहाराची भाषा करायला लागत. गेलेल्या काळात त्यानी किती वेळ माझी आठवण काढली, किती फोन केले.. Adjustments मीच करायची मग त्याच काय..? हे गणिती हिशेबही उगीचच. आजूबाजूची माणस मग गर्दी वाटायला लागतात.. त्या गर्दीत हरवलेली मी एखादा ओळखीचा चेहरा शोधत असते. मनतर समजण्या-उमजण्याच्या पलीकडे गेलेलं असतं..
असंच सगळ असताना आपल रुटीनही सुरूच असतं.. ऑफिस, घर कधीतरी कट्टा, कधी पिक्चर चालूच असतं. या सगळ्यांपेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे "बघण्याचे" कार्यक्रम ही असतात. मग एक दिवस संध्याकाळी आपण ऑफिसमधून निघण्याची वाट बघत काम उरकत असताना अचानक घरून फोन येतो;"कधी निघानारेस??"
"निघेन थोड्यावेळात"
"म्हणजे कधी, किती वेळ"
"काही काम आहे का?"
 "नाही. मज्जा तू लवकर ये"
"...... सांगना"
"हमम..म..म काही नाही तू घरी ये आधी"
"सांग ना"
"अग त्या ------ चा फोन आला होता..."
"मग....
"मग काय, they liked you! They want to take this further....
मी काही रीअक्ट होत नाही.. मला कळत नाही कि ही मज्जा होती कि कुणी माझी गम्मत करताय... ऑफिसच काम उरकायच्या ऐवजी अजून हळूहळू पुढे सरकत. मला काय होत होत माहित नाही. पण आतातर अजूनच भरून येत होत.. .