Wednesday, September 25, 2013

उगीचच

"ते कस काय? वेगळे आहोत तर वेगळेच आहोत ना आता पुन्हा कशाला नवीन dimension द्यायचं?" "ह्म्म्म, बरोबर आहे तुझ. पण… पण काय आहे ना या वेगळेपणाची गंमत आहे. सांगेन कधीतरी." "कधीतरी नको आत्ताच सांग," तिचा हट्ट. "अग वेडाबाई, तू आणि मी वेगळेच पण समुद्र आणि किनाऱ्यासारखे!! पाणी आणि जमीन. स्वतःच्या मर्जीप्रमाणे उधाणलेला कधी खवळलेला, कधी शांत पहुडलेला मी. उगाचच येऊन किनाऱ्याला स्पर्शणारा, कधी खूप आत स्वतःमधे रमणारा, कधी लाडीक लाटांसारखा मनमौजी…. आणि माझ्याप्रत्येक मूडला काही तक्रार न करता शांतपणे सामाऊन घेणारी तू, त्या किनाऱ्यासारखीच शांत, निश्चल! जेवढा किनाऱ्याशिवाय समुद्र अपूर्ण तसाच मीही तुझ्याविना अपूर्णच" तिला वाटलं उगीचच विचारलं त्याला. खूप काही बोलायचंय पण आता शब्द हि सुचत नाहीयेत, नजरेची ती भाषा मनातलं सगळच त्याला सांगतीये. पण तिला हे explanation मान्य नाही कारण तिला आता कुठलाच सारखेपणा नकोय. पुन्हा ती म्हणते तिच्याही नकळत, "बरोबर. एकदम बरोबर पण तरीही आपण वेगळेच. स्वतःचं अस्तित्व जपणारे, आपापल्या मर्यादा असणारे, स्वभाव-गुणांनी विरुद्ध" तो मिस्किल हसतो. एकवार तिच्या नजरेला नजर भिडवून विचारतो "खरच??" तिला तिचाच कळत नाही आता. ती नजर फिरवते तेही उगाचच. कारण उत्तर तर त्याच्या डोळ्यात दिसतंय पण मान्य नाही करायचय ना. मग तोही पुन्हा सांगायला सुरवात करतो. "या समुद्राच्या तळाशी काय आहे माहिती आहे?" ती नुसतीच बघतीये शून्यात काहीही न बोलता. "याच्या पोटात कितीही काहीही असलं तरी तळाशी वाळूच आहे ग, स्वच्छ, निर्मळ वाळू" तो सांगत राहतो. "आणि या किनाऱ्याच्या- वाळूच्या किनाऱ्याच्या तळाशी काय आहे?" ती नकळत विचारते. तो पुन्हा हसतो, म्हणतो, "पाणी! याच समुद्राचं" थोडावेळ एक निरव शांतता आणि समुद्राची गाज ऐकू येते फक्त. तिच्याकडे बघत तो विचारतो "तरीही समुद्र आणि किनारा वेगळेच आहेत का?"

No comments:

Post a Comment