Thursday, July 11, 2013

इरा

इरा... मनमोकळी, बिनधास्त, बडबडी नेहमी हसतमुख आणि जराशी फटकळ असणारी माझी खास मैत्रीण. आयुष्यातल्या चढ-उतारांना सामोर जाताना आणि आपल्याच रुटीनमध्ये गुंतलेली इरा आयुष्याच्या एका टप्प्यावर गोष्टीतल्या प्रमाणेच प्रेमात पडली ... गोष्टीतल्या सारखाच होत ते सगळ. रोजच्या रुटीनमध्ये acquaintance असणार कोणीतरी मित्र व्हावं आणि नकळत आपल्या आयुष्याच भाग होऊन जावं, हे नवीन होत तिला. नकळत आलेलं हे नात स्वीकारताना चेहऱ्यावरच हसू लपत नव्हतं आणि आनंदाला आभाळही कमी पडत होत. आयुष्याचा भाग बनलेल्या त्याला तिन आयुष्य बनवलं. रोजची धावपळ, ऑफीसचं काम, आवडी-निवडी, आजूबाजूचे सहकारी, मित्र-मैत्रीण, घर सगळ काही गप्पांच्या ओघात येत होत. एकमेकांच्या आयुष्यातल सुख-दुखः आपल वाटायला लागलं… तिची नोकरी आणि त्याचा स्वतःचा बिझिनेस. तिथे तोच बॉस आणि इथे तिचा बॉस तिच्या डोक्यावर. तरीही एकमेकांना मेसेज करण, ऑनलाईन chatting करण सुरूच असायचं. गुड मॉर्निंग पासून सुरु होणाऱ्या गप्पा चहा पिला का, वेळेवर जेवलास का, नसेल वेळेवर जेवला तर मग भांडण , आणि मग रुसवे फुगवे... तीचा रुसवा काढायला म्हणून त्यांनी एखादी गझल किंवा शायरी ऐकवावी आणि मग तिची काळी खुलावी इथपर्यंत येउन पोहचल्या. त्याच गलिबवरच प्रेम आणि तिचं गझलचा अर्थ समजून घेण्याचा छंद अगदी जुळून येत होता. उर्दू भाषेविषयीच तीच प्रेम आणि त्या भाषेचा अर्थ समजणारा तो, मस्त जोडी जमली होती. मित्र-मैत्रिणीनी चिडवलं तरी ते हसण्यावारी नेणारी ती, आता त्याच्या छोट्या-छोट्या आणि खोट्या खोट्या थट्टेन अपसेट होत होती. मनाला काळ-वेळ आणि जागेचही बंधन नसत म्हणतात, आणि इराच्या बाबतीत तर हे अगदी खर होत. इथे तर भाषाही वेगळी होती. इरा इथे पुण्यात मराठी कुटुंबात वाढलेली आणि तो तिकडे दूर हजारो किलोमीटरच्या अंतरावर अगदी पूर्व आणि उत्तरेच्या जवळचा हिंदी भाषिक. तरीही खूप matured relation होत ते. आपण प्रेमात आहोत हे उमजल्यानंतर दोघांनीही अतिशय संयमाने आणि सामंजस्याने हे Long Distance Relation संभाळल. कळत-नकळत डोळे भरून यायचे त्याच्या आठवणीनी. मन क्षणात उडून त्याचा इथे जाऊन बसायचं. उगाच अशी हळवी होणारी इरा पहिली मी पहिल्यन्दि. आपण कधीही प्रेमात पडणार नाही आणि असा "फालतूपणा" करणार नाही अस म्हणणाऱ्या इराला प्रेमाच्या वाऱ्यान झपाटलं होत. तिच्या डोळ्यात तरळणार स्वप्न, चेहऱ्यावरच हसू, आणि महत्वाच म्हणजे त्याच्या बद्दलचा विश्वास खूप काही सांगत होता. कारण दोघांनी एकमेकांना फक्त फोटोत पाहिलं होत आणि फोनवर ऐकलं होत. सगळ काही फक्त विश्वासावरच तर चाललं होतना. रात्र जागून पहाट उजाडत होती, झोप झाली नाही अस म्हणण्यापेक्षा, "बस इसी वक्त हि तो तुम फ्री होते हो मुझसे बात करने के लिये" म्हणतानाचा नटखटपणा वाढत होता. त्याला मधेच हुक्की यायची कधी मराठी शिकायची तर कधी भर दुपारी गालिब पासून गुलझार पर्यंत शायरी ऐकवायची. इरा न विचारव "क्यू आज कोई काम नहीं हें क्या?" तर त्यानही म्हणांव "इश्क ने निकम्मा कर दिया हमें वरना हम भी आदमी थे काम के" बास इरा त्याच्या याच अदांवर फिदा झाली होती. म्हणता म्हणता ३ महिने सरले. शायरीतल गालिब खोटा वाटू लागला. कुठल्याच गोष्टीत तीच एकटीच मन रमेना. त्याच्याशी फोनवर बोलून मन भरेना. ती कुठे गेली, कधी आली काय खाल्लं या सगल्याचे अपडेट्स तोही ठेवत होता. आता मात्र चिडचिड होत होती. त्यातच नोकरी बदलली नवीन लोक नवीन जागा, पण तो साथीला होताच. ऑफिस मधली चिडचिड, घरातलं वैतागान, आलेलं frustration त्याच्याशी बोलून कमी व्हायचं. कधी न राहवून तो म्हणायचा "मैं वहा पुना शिफ्ट हो जाता हुं. atleast तुम्हारे साथ तो रेह पाउंगा. तुम्हारी हर छोटी मोटी बात का गुस्सा मुझपे निकाल लेना, लेकिन तुम नाराज ना हना. तुम ऐसे बात करती हो तो लागता ही सारा काम छोड कर अभी इसी वक्त आजाऊ वहा और तुम्हे अपनी बाहोन में समेटलू " काही न बोलता एखादा हुंकार सगळ काही सांगून जायचा. दोघांमधली निशाब्दःता खूप काही सांगून जात होती. त्यानंही ठरवलं आता जायचं तिला भेटायला- तिला जी त्याला त्याच्या प्रत्येक गोष्टीत साथ देत होती, जिच्या साथीत गालिब नव्यान काळात होता ती. जिला कधीही न पाहत न भेटता जिच्या प्रेमात पडला होता ती "इरा". एक दिवस तिन अगदी शांतपणे सांगितलं, "हमें मिलना हे आपसे" "हम भी तो मिलना चाहते हे, लेकिन जरा येह ऑफिस के काम से फुरसत मिले तो हमारी जान से मिलने दौड चले आयेंगे. बस और जरासा इंतजार हम आप के सामने होंगे" "शायद यह इंतेजार हमारी मुलाकात को और देर न लगा दे" मस्तमौला असलेल्या त्याने तिला चिडवण्याच्या उद्देशांनी विचारलं, "अच्छा, तो हमरी बडी strong सी साहिबा को अब और इंतेजार नही हो रहा हें… इसीलिये कहता हे गालिब - निंद तो दर्द के बिस्तर पे भी आजाती है, सिर उनकी आघोष मै हो यह जरुरी तो नहीं" "जी हां, अब जो समझाना है समाझ लीजिये. लेकिन झूठे वादे ना करिये. गालिब ने इसके बारें मै कूछ नही कहा क्या??" "अजी गालिब तो बहोत कुछ कह गया हैं, अब हम कुछ पुछे तो सही सही जवाब देना " "… ह्म्म्म " "हम एक दिन आजाये तो काफी है या फिर २-४ दिन कि छुट्टी निकालही ले?" "What??" "हुजूर , सिर्फ एक दिन आजाये या २-४ दिन कि छुट्टी निकालही ले?" तो मनातल्या मनात हसत होता. तिला कित्ती आनंद होईल, ती कशी आणि काय react करेल हे ऐकायला उत्स्चुक होता. "कब आ रहे हो?? I just can't believe it... Love you love you love you!!!" "अरे हम आ थोडीना रहे है, हम तो सिर्फ पुछ रहे है. वैसे तो तुम्हे भी पता है ना कि हम कतई बिझी हैं आजकल" "मतलब मजाक उडा रहो हो हमारा?" "नही नही. हम तो पुछ रहे हैं और वोह भी बडे नॉर्मली." "कोई जरुरत नहीं हैं तुम्हारे इतने बिझी शेडूल्य से वक्त निकाल कर हमसे मिलने की. जी लेंगे अपने आपपे" तिन जराही विचार न,करता रागावून फोन ठेवला. त्याक्षणी जर कोणी समोर असत ना तर… तर मारून टाकल असत त्याला. तेवढ्यात पुन्हा फोनची रिंग वाजली. तिन पाहिलं त्याचाच होता फोन, हो नाही करत फोन उचलला, काहीही न बोलता ती फोन उभी होती. "ए सॉरी यार मैं तो मजाक कर रहा था. सुनो तो कुछ कह रहे हैं हम" "मुझे अभी बात नहीं करानी, बाद मैं बात करती हुं " "इरा, सिर्फ एक मिनिट सून तो लो" तिन काहीच रिस्पोन्स दिला नाही. ती ऐकती आहे का नाही हे पाहण्यासाठी त्यान पुन्हा विचारलं "इरा….?" "सून रही हुं" "Ok, सुनो मैं नेक्स्ट विक कि तिकट बुक कर रहा हुं. तुम फ्री हो ना? और प्लीज मैं मजाक नहीं कर रहा हुं, I am serious" आनंदानी डोळे पाणावले. नकळत इरा क्षणात म्हणून गेली "आय लव्ह यु अ लॉट. मैं फ्री हुं. तुम आ जाओ" दोघांचीही खळी खुलली. एक आठवडा कधी असं झालं होत दोघांना. तिची excitement आभाळाला पोहाचली होती. तिचा विश्वास सार्थ ठरत होता. खूप फिल्मी वाटणार हे नात प्रत्येक्षात उतरताना पाहिलं मी. इरा भरभरून बोलायची त्याच्याबद्दल. तो येणार म्हणाल्यावर तर काय करू आणि काय नको अस झालं होत तिला. शेवटी एकदाचा तो दिवस उजाडला आणि तो आला. ऑफिस मधूनसगळ काम घाईघाई आटपून ती हाफ-डे निघाली. निघाली आत्ता होती पण मन, ते तर कधीच त्याच्यापाशी जाऊन पोहचल होत. इथे आल्याआल्या त्यांनी फोन केला होता पण ती मिटींग्जमध्ये बिझी, जराही वेळ मिळत नव्हता बोलायला, SMS वरूनच बोलण सुरु होत. finally काम संपल आणि ती निघाली. लिफ्टमध्ये पाय ठेवल्याक्षणी तिन फोन लावला, नेहमीप्रमाणे फोन एका रिंगमध्येच फोन उचलला, ती काहीहि विचार न करता म्हणाली "मुझे आने में जरा लेट होगा, आप लंच कर लिजिये" "क्यू????" "काम बाकी है जरा" जर नाइलाजाने तो "ठीक है, पर लंच नही, वोह साथ में हि करेंगे" "अछा…. ठीक है, तो दरवाजा खोलो आय इम ऑल हियर " "What" "ओपन द डोअर" त्याने सुपर excitement मध्ये दार उघडलं. क्षणभर दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि जराही विलंब न करता त्यानं तिला मिठीत घेतलं. एकमेकांना भेटल्याच सुख ओसंडून वाहत होत. इमोशनल इरा, तिचे भरून आलेले डोळे त्यांनी अलगद पुसले, मानेनीच नाही म्हणत त्यांनी तिला अजून जवळ ओढलं. अब समझ आ रहा हैं किसीने क्युं कहा था, "इश्क किजिये फ़िर समझीये जिंदगी क्या चीझ हैं". दोघे खळखळून हसले. लग रहा हैं हमे हमारी खोयी हुइ जिंदगी मिल गयी. एकमेकांच्या साथीत वेळ कसा गेला कळल नाही. दिवस मावळायला आला, पोटात भुकेची जाणीव झाली. दोघे हि बाहेर निघाले, जरास फिरून मस्त जेवायला गेले. घरी पोहोचेपर्यंत उशीर झाला पण मनानी ती अजूनही तिथंच होती त्याच्या कुशीत. ती रात्र कशीबशी गेली आणि दिवस उजाडल्यावर इरा न आधी त्याला फोन केला. पिच्चरला जायचा प्लान ठरला. पिच्चर, नंतर जेवण आणि पुन्हा तोच एकांत. तो हवाहवासा एकांत. एकमेकांच्या प्रेमात असणारे हे दोघे कधी जगाच्या साऱ्या रिती, नियम तोडून एकमेकांचे झाले ते त्याचं त्यांनाही कळल नाही. क्षणभर सुद्धा एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते दोघ. त्या रात्रीच तो परत निघणार होता, इरा नि थांबायचा हट्ट नाही केला ते शक्यही नव्हत. अतिशय भरून आलेले अश्रू तिन आवरले. त्याच्याकडे पाहत राहिली. त्याची आणि तिची नजरानजर होताच त्याचाही तोल गेला. इतकावेळ सांभाळलेल मन अचानक हळवं झालं. तिला पुन्हा मिठीत घेताना त्यालाच रडू कोसळलं. मी पुन्हा येईन, लवकरच येईन म्हणत त्यान निघायची तयारी केली. जाताजाता म्हणाला,"ये दो दिन मैं सिर्फ़ और सिर्फ़ अपने लिये जिया हुं, अपने आप को सांभाल नहीं सकता था, आज तुम्हे सांभालने लगा हुं. वापस जाना इतना मुश्किल होगा ये सोचा नहीं था कभी." ती काही बोलणार इतक्यात "चलो" म्हणून तो चालू लगला. पुढचे दोन दिवस इरा एकदम नाराज होती, तीच मन अजूनही त्या भेटीतच गुंतलं होत. त्या नंतर साधारण महिनाभरा नंतरची गोष्ट. तो दिल्लीला निघाला होता. जाताना कसाबसा वेळेत ट्रेन पकडत त्यान SMS केला. त्या नंतर २-३ SMS आले आणि "बस और १० -१५ मिनट में पोहचुंगा" हा शेवटचा SMS. शेवटचा यासाठी कि त्या दिवसानंतर आज तागायत तो फोन लागला नाही. तीन त्याला फोन, मेल, SMS केला पण कुठूनच काहीच रिस्पोन्स नाही. इराचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरत होता. तिची अवस्था बघवत नव्हती, डोळ्यातलं पाणी थांबत नव्हत. तिला वाटत होत थेट दिल्ली गाठावी आणि त्याला जाब विचारावा अस का केलंस याचा. पण मनाला काळजी पण होती कि त्यालाच तर काही झाल नसेल ना? या अधांतरी, अवघड मनस्थितीत असतानाच तीन त्याच्या ऑफिसच्या नंबरला फोन लावला आणि … आणि तो फोन बंद होता. तिथल ऑफिस म्हणजेच त्याचा बिझिनेस बंद झाला होता. भिरभिरणार्या मनाला हे जग खूप मोठ, अथांग वाटायला लागल होत. एवढ्या मोठ्या जगात, इतक्या माणसांच्या गर्दीत त्याला कुठे शोधणार. इरासारखी वेळ कोणावरही येऊ नये. तीच खचलेल मन, तिची संपलेली उमेद आणि न संपणारा शोध हे अनुभवन एखाद्या कथेप्रमाणेच होत. ६ महिने उलटले. घरच्यांसमोर सगळ काही ठीक आहे अस दाखवायचं बळ हि आता संपल. आम्ही सर्वांनी तिला यातून बाहेर काढायचे प्रयत्न केले, पण जेंव्हा तिन मनावर घेतलं तेंव्हाच ती या सगळ्यातून सुटणार होती. लवकरच तिनही मनावर घेतलं. आयुष्य नव्यानं सुरु झालं. आज इरा एका चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पोस्ट वर काम करतिये. पूर्वी सारखी मित्र-मैत्रीणच्या गराड्यात रमातीये. पुन्हा आपल्या मनाला नव-नवीन स्वप्न बघायला शिकवातीये. खूप सावरलीये इरा आता, पण प्रेम या गोष्टीवरून विश्वास उडालाय तिचा. तिच्या हसण्यात आता मिस्किलपणा दिसत नाही, आजही डोळे गर्दीत काही तरी शोधत असतात. आजकाल स्वतः मध्येच रमते. म्हणते atleast माझ मन तरी माझ्याशी प्रामाणिक राहिलं आणि खरंच आहे कि "निंद तो दर्द के बिस्तर पे भी आजाती है, सिर उनकी आघोष मै हो यह जरुरी तो नहीं"

No comments:

Post a Comment