Monday, July 1, 2013

कुलकर्णी सर

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः । गुरुरेव साक्षात परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः "सकाळी ६.३० वाजता मराठी मिडीयमची ब्याच असते" कुलकर्णी सर  म्हणाल कि  एक वाक्य आधी आठवत. १० वीत जाई पर्यंत मी कधी कुठला क्लास लावला नाही. दहावीच वर्ष खूप महत्वाच, घरी अभ्यास होणार नाही म्हणून क्लास ला जायचं. वाह! इतकी वर्ष घरी अभ्यास केलाच कि आपण मग आताच कशाला क्लास आणि बीस. पण नाही क्लास हा लावायचाच. त्यातही आम्ही तेंव्हा जिथे राहायचो तिथे सर्वांनी जो क्लास लावला तोच लावायचा. जणू परंपरा होती ती त्या चाळीची. दहावीच वर्ष आलं. घरच्यांपेक्षा आजूबाजूच्यांना काळजी मी कधी क्लास जॉइन करते याची. परंपरेप्रमाणे आम्ही "कुलकर्णी क्लासेस" मध्ये चौकशीसाठी गेलो आणि मी तिथेच जायचं असं सर्वानुमते ठरलं.
त्या क्लासला जायची माझी मुळीच इच्छा नव्हती कारणही अतिशय महत्वाच (माझ्यासाठी) होत ते म्हणजे त्या क्लासची वेळ. "सकाळी ६.३० वाजता मराठी मिडीयमची ब्याच असते" बास एका वाक्यावरच माझं  मन कुलकर्ण्यांच्या नावानी बोट मोडायला लागल. आधीच १०वी मुळे मला अगदी भल्या पहाटे म्हणजे ८- ८.३० वाजता उठाव लागत होत आणि त्यात हे कुलकर्णी. "सकाळी ६.३० वाजता… " घरच्यांनी त्यांचे मनापासून धन्यवाद मानले कि आता तरी मी लवकर उठायला शिकेन म्हणुन. आणि अशा रीतीने माझी वर्षभराची सकाळ "कुलकर्णी क्लासेस" मध्ये फिक्स झाली.
पण या क्लासला जायला लागल्या पासून मी खरोखरच रोज लवकर उठायला लागले आणि एकही दिवस न चुकवता मी वर्ष भर क्लासला गेले आणि तेही वेळेवर - सकाळी ६. ३० वाजता. त्यामुळे खरच कुलकर्णी सरांचे आभार. स्वतः इंग्लिश मिडीयम मध्ये शिकूनही ते मराठीत छान शिकवायचे. त्यांनी गणिताचा पाय अगदी पक्का करून घेतला होता आमचा. आणि इंग्लिश तर काय, माशा अल्लाह. एकदम भारीच. त्यातच मला भाषेविषयी असणार प्रेम त्यामुळे आपण तर एकदमच इम्प्रेस बाबा. मग काय रात्री कीतीही उशीर होऊदेत सकाळी क्लास बुडवायचा नाही आणि वेळेत क्लासला जायचं. रोज सकाळी सायकल  काढायची आणि क्लास गाठायचा. तिथे गेल्यावर "Home Work" केला कि नाही, हे गणित कसं सोडवलं कित्ती कित्ती गप्पा. त्यातच क्लास सुरु झाला कि मग खरी गंमत. आमचे सगळे फंडे फ़्लॉप कारण सर तेच गणित एकदम सोप्या भाषेत सोडवून द्यायचे. नेहमी फॉरमल ड्रेसिंग, साधी लेदरची चप्पल, आणि चेहऱ्यावर खऱ्या अर्थानी अर्धस्मित हास्यतास . पण जर कधी काही जोक झाला तर एकदम दिलखुलास हसणारे कुलकर्णी सर आम्हा प्रत्येक विद्यार्थ्यांना अहो जावो च म्हणायचे. तस ते येणार जाणाऱ्या प्रत्येकेला, लहान-मोठ्यांना अहो-जावो च म्हणायचे. सरांचा अजून एक जिव्हाळ्याचा विषय- माधुरी दिक्षित. बास माधुरीच नाव आणि सरांची स्माईल. भूमितीच्या प्रत्येक रेषेला/ आकृतीला नाव हे ABC नाही तर MNP च नाव, आम्ही उगीचच मग सरांना चिडवायचो कि M फॉर  माधुरी.

पण खर सांगायचं तर या माणसानी आम्हाला सर्वांना  अगदी शब्दशः घडवलं. खूप साऱ्या अभ्यास बरोबरच आमच जनरल नॉलेज हि वाढवलं. आम्ही पुढे काय करणार, त्यासाठी आम्हाला काय काय तयारी करावी लागणार आहे यासाठी आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे कुलकर्णी सर. म्हणता म्हणता वर्ष संपल आणि रिझल्ट आला. फर्स्ट क्लास मिळाला. आता कॉलेजला जाणार आणि क्लासचा मित्र परिवार सुटणार म्हणून वाईट वाटल आणि त्या बरोबरच आता सर नाही येणार आपल्याला शिकावायला ह्याचही. त्या वर्ष भरात जी काही धमाल केली होती ती खूप मिस करणार होतो आम्ही पुढे. पण सरांच मार्गदर्शन, पाठीवर कौतुकाची थाप हि कधीच त्या वर्ष्या बरोबर संपली नाही. कारण त्या नंतरही मी माझे पुढचे रिझल्ट, माझी पहिली नोकरी आणि त्या नंतरच्या प्रत्येक नोकरीचे आणि छोट्या-छोट्या अचीव्हमेंट आजही मी सरांन बरोबर शेअर  करते. ते अजूनही त्याच उस्फुर्तपणे कौतुक करतात. खरच त्याचं कौतुक आजही तितकच प्रेरणादायी आहे माझ्यासाठी.  त्यांनी हि आताच काही २-४  वर्ष्यापूर्वी जर्नालिझम चा कोर्स पूर्ण केला आणि नेट-सेट ची परीक्षा दिली ती हि यशस्वी पणे. 
खूप दिवसांत सरांना मी भेटले नाही. पण आता या एखा नंतर नक्कीच त्यांना स्पेशली भेटायला जाणार आहे. Sir, we all are proud of you and big time thanks to you कारण तुम्ही आम्हाला घडवलंत.

Wish you the long, wonderful, healthy and ofcourse wealthy life ahead!! :)

No comments:

Post a Comment